बॅन झालेलं PUBG ‘या’ मार्गाने खेळता येणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- भारत-चीन सीमारेषा भागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून 118 चिनी अ‍ॅप वापरण्यावर बंदी घातली आहे. यामध्ये सध्या सर्वाधिक लोकप्रिय असलेले PUBG अ‍ॅप देखील बॅन करण्यात आले आहे.

मात्र आता तुम्ही अजून एका मार्गाने तुम्हाला आवडणारा PUBG गेम खेळू शकणार आहे. PUBG Mobile हा गेम दक्षिण कोरियन कंपनी ‘ब्लूहोल’ने तयार केला आहे.

असं असलं तरी PUBG Mobile या फिचरमध्ये काही चिनी कंपन्यांची भागीदारी आहे. त्यामुळे डेटा लिक होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. या एकमेव कारणामुळे PUBG mobile गेमवर भारतभरात बंदी घालण्यात आली.

PUBG desktop याच्या माध्यमातून तुम्ही आताही PUBG गेम खेळू शकता. कारण देशभरात या गेमवर अद्याप बंदी घातलेली नाही.

PUBG desktop या फिचरचे राईट्सदेखील दक्षिण कोरियन कंपनी ‘ब्लूहोल’ यांच्याकडेच आहेत. मात्र यात कोणत्याही चिनी कंपनीची भागीदारी नाही. त्यामुळे या फिचरवर भारतात बंदी घातलेली नाही.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment