अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यास वरदान ठरणाऱ्या भंडारदरा धरण पाणलोटात जोरदार पाऊस सुरु असल्याने दोन दिवसांत हे धरण निम्मे भरण्याची शक्यता आहे.
सर्वत्र अधूनमधून वाहणारे धबधबे, खळखळणारे ओढे नाले यामुळे भंडारदरा परिसरातील सौंदर्य बहरले आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व लॉकडाऊन असल्याने पर्यटकांविना हा परिसर सुनासुना आहे.
याठिकाणी लाखो पर्यटक भेटी देत असतात. निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचा आणि आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतात. यामुळे याठिकाणची आर्थिक उलाढाल प्रचंड होत असते.
परंतु आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या गोष्टींना खीळ बसली आहे. दरम्यान, 11 हजार 039 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सकाळी पाणीसाठा 5 हजार 188 दलघफू होता.
त्यात वाढ होत असून सायंकाळी तो 5241 दलघफू झाला होता. पावसाच्या सरी अधून मधून कोसळत असल्याने हे धरण निम्मे होण्याची शक्यता आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा