अहमदनगर लाईव्ह 24 टीम:- एका तरुणीचा हात-पाय बांधलेला अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशमधील रायबरेली येथे घडली. मृत तरुणीची ओळख झाली असून ती बछरावाच्या बाजारपेठेत राहणारी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दोन दिवसांपासून मृत तरुणी कॉलेजमधून बेपत्ता होती. तरुणी विधानपरिषद आमदार प्रताप सिंह यांच्या भावाच्या कॉलेजमध्ये एमएससीमध्ये शिकत होती.
काल (2 फेब्रुवारी) हरचंदपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ढाब्याच्या मागे या तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. त्यानंतर पोलीस या घटनेची अधिक चौकशी करत आहेत.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पहिले तरुणीची हत्या केली त्यानंतर पुरवा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्यात आला, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
मुलीचे हात पाय बांधले होते आणि गळाही आवळलेला होता. पायाच्या शूजही अर्धवट जळालेले आहेत. जवळच जेंट्स पर्स, केमिस्ट्री पुस्तक जळलेल्या अवस्थेत आढळले. केरोसीन तेलाने शरीर जाळण्यात आले आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com