राहुरी :- तालुक्यातील उंबरे येथील नवविवाहितेचा मृतदेह वांबोरी शिवारातील गडाखवस्ती येथील विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळला. योगिता ऋषिकेश ढोकणे असे तिचे नाव आहे.
चारित्र्याचा संशय घेऊन पती व सासूने शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबतची तक्रार विवाहितेचे वडील रघुनाथ केशव दरेकर (ताहराबाद, ता. राहुरी) यांनी वांबोरी दूरक्षेत्रात दिली आहे.

सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास उंबरे येथील राहत्या घरातून बेपत्ता झालेली योगिता ही सोमवारी सायंकाळपर्यंत उंबरे-वांबोरी रस्त्यावर असलेल्या गडाखवस्ती परिसरातील झाडाच्या सावलीत बसली होती.
ही महिला कोणाची वाट पाहत असावी असे वाटल्याने तिच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. योगिताला बेपत्ता होऊन चोवीस तास उलटले, तरीही ती घरी न आल्याने तिचा सर्वत्र शोध सुरू झाला.

मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास सचिन अनिल गडाख हे आपल्या शेतातील घासाला पाणी देण्यासाठी विहिरीवर गेले असता त्यांना महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला.
पोलिसांशी संपर्क साधून त्यांनी ही माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहवर काढून ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
वर्षभरापूर्वी ९ मे २०१८ रोजी योगीताचा उंबरे येथील ऋषिकेश ढोकणे याच्याशी मोठ्या थाटामाटात विवाह झाला.
- Mahindra Scorpio खरेदीसाठी 400000 रुपये डाऊन पेमेंट केल्यानंतर किती EMI भरावा लागणार ? पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन
- Motorola लवकरच मोठा धमाका करणार! लाँच होणार ‘हा’ नवीन स्मार्टफोन
- ओला, बजाजच्या स्कूटरला टक्कर देण्यासाठी लॉन्च झालेली नवीन इलेक्ट्रिक Scooter ! कसे आहेत फिचर्स?
- तुमच्या आईच्या किंवा वडिलांच्या नावे पोस्टाच्या ‘या’ योजनेत 100000 रुपयांची गुंतवणूक करा, 24 महिन्यांनी मिळणार जबरदस्त रिटर्न
- तारीख ठरली ! ‘या’ मुहूर्तावर लॉन्च होणार वनप्लस 15, किंमत किती राहणार ?