अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ राहुरी: मुळा धरणाच्या पाण्यात बुडालेल्या स्थानिक तरुणाचा मृतदेह शोधून काढण्यासाठी अहमदनगर महापालिकेच्या विशेष पथकाला यश आले. पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर रविवारी दुपारी १ वाजता नानासाहेब जाधव या तरुणाचा मृतदेह मुळा धरणाच्या ठाकरवाडी परिसरातील पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
शनिवारी सायंकाळी ५ वाजता मुळा धरणात मासेमारीसाठी गेलेल्या नानासाहेब जाधव (वय ३५) चक्कर आल्याने पाण्यात बुडाला होता. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, पोलिस काॅन्स्टेबल पोपट टिक्कल यांनी घटनास्थळी जावून नानासाहेबचा शोध घेतला. मात्र अंधार पडल्याने या मर्यादा आल्या होत्या.
रविवारी सकाळी तहसीलदार फैसुद्दीन शेख, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी नॅशनल डिफेन्सच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करून शोध मोहिमेला सुरुवात केली. या पथकाने चार तास पाण्यात शोध घेतला असता नानासाहेबाचा मृतदेह हाती लागला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com