वृत्तसंस्था :- नात्याला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक, भयानक घटना मध्यप्रदेश राज्यामध्ये घडली.आपल्याच आई, बहिण आणि वहिनीवर वारंवार बलात्कार करणार्या दारुड्या मुलाच्या त्रासाला कंटाळून अखेर त्याच्या वडिलांनी त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आलीय
दतिया येथे एका परिवारातील सदस्यांवर त्यांच्याच व्यसनी मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मृतकाच्या वडिलांसह परिवारातील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
परिवारातील सदस्यांची चौकशी केली तेव्हा त्यांनी हत्या केल्याचं मान्य केलं. त्यांनी सांगितले की, दारूच्या नशेत हा व्यक्ती आपली आई, बहिण आणि वहिणीवर वारंवार बलात्कार करत होता.
मृतक इसमाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की,पोलिसांनी चौकशी केल्यावर आरोपी वडीलांनी सांगितले की,११ नोव्हेंबर रोजी आपला मुलगा नशेत घरी आला आणि आपल्या लहान भावाच्या बहिणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.
त्याने यापूर्वी अशाच प्रकारे अनेकदा बलात्कार केला होता. त्याच्या या कृत्याला कंटाळून आम्ही त्याची हत्या केली आणि त्यानंतर त्याचा मृतदेह गोपालदास टेकडीजवळ फेकून दिला.
या हत्येप्रकरणी पोलिसांनी मृतकाचे वडील, मृतकाची आई, मृतकाचा लहान भाऊ आणि वहिनी यांना अटक केली आहे.