अहमदनगर नगर-मनमाड महामार्गाची झालीय ‘ही’ अवस्था; नागरिकांत असंतोष

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-  रस्त्यांची दुरवस्था हा अहमदनगर जिल्ह्याला लागलेला शाप आहे. जिल्ह्यातील अनेक महामार्ग खराब झाले आहेत. नगर-मनमाड महामार्गाचीही अशीच दुरवस्था झाली आहे.

खड्ड्यांचा महामार्ग म्हणून या ममार्गाची आता ओळख झाली आहे. अनेक अपघातही या महामार्गावर झाले आहेत. या महामार्गावरून वाहने चालवणे म्हणजे वाहनांचा खुळखुळा करण्यासारखे आहे असे मत प्रवासी व्यक्त करतात.

नागरिकांमध्ये याबद्दल असंतोष असून या महामार्गाची दुरवस्था लवकर दूर करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. मागील 25 वर्षांत या महामार्गावर एकाचवेळी एकाच दमात कधीही काम पूर्णत्वास गेले नाही.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साईबाबांचे शिर्डी आणि शनी शिंगणापूर ही दोन तीर्थक्षेत्रे या रस्त्याने जोडलेली आहेत. नगरपासून कोपरगावपर्यंत या महामार्गावर खड्ड्यांचेच साम्राज्य पसरलेले आहे.

या खड्ड्यांमुळे ह्या रस्त्यावर शेकडो अपघात झाले आहेत. या महामार्गाला जोडणारा दक्षिणोत्तर कोल्हारचा पूल कायम खड्डामय आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पुलावर मालवाहतूक ट्रक्स, ट्रॅक्टर नेहमी नादुरुस्त होतात.

खड्ड्यांमुळे पुलावर वाहतुकीची मोठी कोंडी होणे ही येथील नित्याची बाब आहे. या महामार्गाच्या दुरुस्तीच्या मागण्यांसाठी सर्वसामान्य जनतेने अनेकदा आंदोलने केली

परंतु या आंदोलनांची दखल संबंधित विभागाने आणि कोणत्याही पुढाऱ्याने घेतली नाही. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये असंतोष खदखदत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment