अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-कर्जत तालुक्यातील गायकर वाडी येथील कोविड सेंटरवर रुग्णांचे हाल आहेत. स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. अगोदरच भीतीने त्रस्त झालेले रुग्ण येथील अस्वच्छतेमुळे बेजार झाले आहेत.
दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथील संेऺटरवर जागा नसल्याने गायकर वाडी येथील शासकीय वसतिगृहात दुसऱे सेंटर सुरू केले आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2020/08/Coronavirus-ahmednagar.jpg)
परंतु याठिकाणी अनेक सुविधा नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. या आजारात जास्तीत जास्त गरम पाण्याचा वापर करावा असे सांगितले जाते परंतु याठिकाणी गरम पाण्याची कसलीच सोय नाही.
आंघोळ देखील गार पाण्याने करावी लागत असलेले आजार अधिकच बळावत आहे. वस्तीगृह मोठे असले तरी याठिकाणी स्वच्छतेचा अभाव आहे.
स्वच्छता गृहाची दुरवस्था झाली असून याठिकाणी सर्व विधी उरकण्यासाठी किळस येते. स्वच्छता करण्यासाठी या ठिकाणी कोणीही कर्मचारी येत नाहीत. रुग्णांनाच आपापली स्वच्छता ठेवावी लागते.
तसेच कोरऺटाईन सेंटरवर रुग्णांना चहा व नाश्ता मिळत नाही. काही सामाजिक कार्यकर्ते चहा व नाश्त्याची सोय करतात. कर्जत येथील पत्रकार भाऊसाहेब तोरडमल अशिष बोरा यांनी पिण्याच्या पाण्याचे जार व चहा नाष्ट्याची सोय केल्याने तरी काही लोकांची सोय झाली.
अन्यथा प्रशासन रुग्णांच्या सोयीसुविधा कडे दुर्लक्ष करत आहे. याठिकाणी शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही कुपनलीकेचे पाणी प्या असे सांगितले जाते.
गायकर वाडी येथील सेंटरवर रेपी टेस्टद्वारे रुग्णांची तपासणी केली जाते. परंतु याठिकाणी रुग्णांनी असा काय गुन्हा केला आहे अशाप्रकारे त्यांना डॉक्टर व त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून वागणूक दिली जात आहे
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved