अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- मोटारसायकलवरून जामखेडकडे येत असलेल्या दाम्पत्यास अज्ञात तीन चोरट्यांनी मोटारसायकल आडवी त्यांना ढकलून देत खाली पाडले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून महिलेच्या अंगावरील सर्व दागिने घेवून पोबारा केला.
ही घटना जामखेड खर्डा रोडवरील सतेवाडी फाट्याजवळ घडली. नुकताच जामखेड पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारलेले पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी नुकतीच एक बैठक घेत तालुक्यातील अवैध व्यावसायांचा बिमोड करणार असल्याचे जाहीर केले होते.
मात्र त्यांच्या आवाहनाला काही तासांचा कालावधी उलटत नाही तोच चोरांनी दाम्पत्याची लूट करून पोलिसांना आव्हानच दिले आहे. याबाबत सविस्तर असे की, चंदुलाल पठाण व झुलेखा चंदुलाल पठाण हे पतीपत्नी खर्डा जामखेड रोडने जामखेडकडे त्यांच्या मोटारसाकलवरून येत होते.
ते दाम्पत्य सतेवाडी फाट्याजवळ आले असता. पाठीमागून स्प्लेंडर मोटारसायकलवर ट्रिपल सीट आलेल्या अनोळखी चोरट्यांनी जामखेड किती अंतरावर आहे.
असे विचारण्याचा बहाणा करत फिर्यादी पठाण यांच्या मोटारसायकलला त्यांची मोटारसायकल आडवी लावून फिर्यादी व त्यांच्या पतीस मोटारसायकलसह रस्त्याच्या बाजूला ढकलले.
त्यानंतर या दाम्पत्यास चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील मंगळसूत्र, सोन्याचे कर्णफुले, कुडके व रोख रक्कम असा एकूण ३३ हजारांचा ऐवज बळजबरीने काढून घेतला.
याप्रकरणी झुलेखा चंदुलाल पठाण यांनी जामखेड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोसई नाऱ्होडा हे करत आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये