नौकरीच्या आमिषाने नायब तहसिलदारास लाखोंना गंडा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ म्हणजेचज महावितरण कार्यालयात मुलाला नोकरी लावून देतो असे अमिष दाखवून कोपरगावच्या महिला नायब तहसीलदारास राहुरी तालुक्यातील मुसळवाडीच्या तरूणाने दीड लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याप्रकरणी कोपरगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मनिषा प्रभाकर कुलकर्णी (रा. नोकरी रा . गुलमोहोर कॉलनी, इंदिरापथ) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान मनीषा कुलकरींनी या या कोपरगाव तहसीलमध्ये नायब तहसीलदार आहेत. त्यांचा मुलगा नोकरीच्या शोधात होता.

नोकरीची जाहिरात वाचून त्या नगर येथे एमएसईबी कार्यालयात गेल्या असता तिथे नितीन शहाजी धुमाळ (रा. मुसळवाडी, ता. राहुरी जि. अहमदनगर) हा भेटला. भेटीदरम्यान धुमाळ याने तुमच्या मुलास क्लार्कची नोकरी लावून देतो मला तीन लाख रुपये द्या, आधी दीड लाख व नंतर राहिलेले दीड लाख रुपये द्या अशी मागणी त्यांच्याकडे केली.

तसेच विश्वास संपादन करुन मुलास नोकरी लावण्याचे अमिष दाखविले. एप्रिल 2018 ते जून 2018 या काळात धुमाळ याने कुलकर्णी यांच्याकडून 1 लाख 32 हजारांची रक्कम त्याचे स्वतःचे नगरच्या एमएसईबी ऑफीस येथे तसेच अ‍ॅक्सीस बँक शाखा खात्यात जमा करुन घेऊन त्यांची फसवणूक केली आहे.

या प्रकरणी कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून गुरुवार दि. 21 जानेवारी रोजी सायंकाळी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. पुंड हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment