अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. मार्च महिन्यापासून जिल्हाभरातील वैद्यकीय सुविधा तैनात आहे. शिर्डीमध्येही हीच परिस्थिती आहे. परंतु सलग ३ महिने कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देणारे डॉक्टरही त्रासले आहेत.
डॉक्टर असलो, तरी आम्ही शेवटी माणसेच आहोत. आता तरी आमच्या मदतीला तालुक्यातील सरकारी सेवेतील 12 एमबीएस डॉक्टर धाडावेत. गेली तीन महिने दोन्ही केंद्रात रुग्णांवर उत्तम उपचार होतात.
मात्र, सर्व जबाबदारी आमच्या खांद्यावर टाकू नका, अशी मागणी साईसंस्थानच्या सेवेतील 32 एमबीबीएस डॉक्टरांनी केली आहे. तीन महिन्यांपासून या केंद्रात साईसंस्थानाचे 32 डॉक्टर सेवा देत आहेत.
साईसंस्थानने तीन महिन्यांपूर्वी येथे दोन कोविड सेंटर सुरू केले. सर्व भार साईसंस्थानच्या यंत्रणेवर टाकून सरकारी अधिकारी मोकळे झाले. तीन महिने लोटले, तरी येथील डॉक्टरांकडे पाहायला कुठलाही अधिकारी तयार नाही.
उलट शेजारच्या अन्य तालुक्यांत हे काम सरकारी सेवेतील डॉक्टर मंडळी व खासगी सेवा करणारी डॉक्टर मिळून करीत आहेत. हा आमच्यावर अन्याय आहे. आम्हीही माणसे आहोत. आमच्याकडे कुणीही लक्ष देत नाही, अशी भावना डॉक्टरांत निर्माण झाली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved