दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पकडले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  कोपरगाव तालुक्यातील संवत्सर चौफुलीपासून पुढे रेल्वे पुलाच्या ठिकाणी कोपरगाव पोलिसांनी दि. २५ फेब्रुवारी रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास सापळा रचून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन आरोपींना पकडले आहे. त्यांचे अन्य पाच ते सहा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. या आरोपींकडून पोलिसांनी चाकू, सुऱ्या, लोखंडी पाईप, स्टम्प, कटावणीसह मोटारसायकल जप्त केली.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, दि. २५ फेब्रुवारी रोजी रात्री रेल्वे ब्रीजवर पाच ते सहा अनोळखी इसम धारदार हत्यार घेवून धमकावून वाहनचालकांची लूट करीत असल्याची कोपरगाव पोलीस ठाण्यास खबर मिळाली.

पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. सोमनाथ राऊत, पो. हे. कॉ. आर. पी. पुंड हे संवत्सर चौफुली ते रेल्वे ब्रीजकडे निघाले असता दोन मोटारसायकलवर पाच ते सहा इसम रात्री १.३५ वा. रोडवर उभे राहून वाहनचालकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी त्यांचे वाहन बाजूला लावून या चोरट्यांचा पाठलाग करीत त्यातील दोन तुषार उर्फ गोकुळ राजेंद्र दुशिंग (वय २४, रा. टिळकनगर), नीलेश प्रदीप चव्हाण (वय २६, रा. भगवा चौक, गांधीनगर, कोपरगाव) यांना पकडले. त्यांच्याकडून चाकू, सुऱ्या, लोखंडी पाईप, स्टम्प, कटावणीसह, विना नंबरची हिरोहोंडा मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे. यावेळी अन्य आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले.

या आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी पळून जाणाऱ्या अविनाश भगुरे व त्याचे दोन मित्र रा. कोपरगाव यांची माहिती पोलिसांना दिली. यापूर्वीही या आरोपींना रस्तेलूट प्रकरणात अटक करण्यात आली असल्याची पोलीस सूत्रांनी माहिती दिली. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात रस्तालुटीचा गुन्हा वरील सर्व आरोपींवर दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर हे पुढील तपास करीत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment