अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- उचल म्हणून दिलेले पैसे परत मागितले असता शेतकऱ्याला दोघांनी मारहाण केल्याची घटना नगर तालुक्यातील तांदळी वडगाव येथे बुधवारी (दि. १८) दुपारी दोनच्या सुमारास घडली.
याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात सुदाम रानेबा झिने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर असे की, शरद ज्ञानदेव घिगे (वय- ४०) हे शेतकरी बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास तांदळी वडगावात घरी असताना आरोपी तेथे आले.
यावेळी शरद घिगे यांनी सुदाम झिने यांना पूर्वी उचल म्हणून दिलेले ५० हजारांची मागणी केली. पैशांची मागणी केल्याचा राग झिने याला आल्याने त्याने घिगे यांनी मारहाण करत तुझे पैसे परत देणार नाही, यावेळी घिगे यांना आरोपींनी लाथाबुक्यांनी मारहाण केली.
तसेच डाव्या हाताच्या दंडावर चावा घेवून जखमी केले. तसेच जर परत पैसे परत मागीतले तर जीवे ठार मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच याप्रकरणी शरद घिगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कदम करत आहेत.