रुग्णालयात उपचार बंद असल्याने आर्थिक वंचितांचे होतायत हाल

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात करोना उपचार केंद्र सुरू केल्याने अन्य रुग्णांवर उपचार करणे बंद केले गेले होते. मात्र आता करून परिस्थिती आटोक्यात येत आहे. यामुळे येथील पूर्वीचे उपचार व इतर सेवा सुरु कराव्यात अशी मागणीकेली जात आहे.

सध्या श्रीरामपुरात साधारण आठ ते दहा रुग्ण सापडतात. ही संख्या अतिशय कमी झाल्याने याठिकाणी या सुविधा पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत श्रीरामपुरात शिरसगाव येथे 203-14 साली ग्रामिण आरोग्य रुग्णालयाची 30 खाटांची सुसज्ज इमारत उभी राहिली.

येथे आंतररुग्ण, बाह्यरुग्ण, तपासणी, प्रसूती तपासणी व प्रसूती, लहान मुलांचे लसीकरण, कुटुंब नियोजन शस्रक्रिया, श्वान दंश उपचार, सर्प दंश उपचार, एक्स रे, प्रयोगशाळा, डोळ्यांची तपासणी व शस्रस्क्रिया,दातांची तपासणी व उपचार, कुष्ठरोग, क्षयरोग, एड्स आदी दुर्धर आजारांची तपासणी उपचार, माहिती, सल्ला व मार्गदर्शन केले जाते.

याशिवाय येथे विवाह नोंदणीही केली जाते. मात्र हे सर्व उपचार बंद करून तातडीने करोना उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. सध्या येथे करोना उपचार केंद्र सुरू झाल्याने या सर्व आजारांवरील उपचार बंद आहेत. त्यामुळे गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहेत.

सध्या डॉॅ. बाबासाहेब आंबेडकर करोना उपचार केंद्र व ग्रामीण रुग्णालय या शासकीय रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार केले जातात.

तर तीन खाजगी रुग्णालयांत उपचार केले जात आहेत. सध्या श्रीरामपुरात साधारण आठ ते दहा रुग्ण सापडतात. ही संख्या अतिशय कमी झाल्याने याठिकाणी या सुविधा पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.