अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : गावठी कट्ट्याचा धाक दाखवून व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून व्यापाऱ्याची तब्बल सव्वाचार लाख रुपयांची लूट करण्यात आली. हा प्रकार सोमवारी रात्री घडला.
वैभव शेटिया असे मारहाण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. नगर-मनमाड महामार्गावरील एमआयडीसी परिसरात ही घटना घडली. माजी नगरसेवक विपुल शेटिया यांचे बंधू वैभव यांचे एमआयडीसीतील नवनागापूर येथे वैभव सेल्स कार्पोरेशन हे दुकान आहे.
सोमवारी रात्री ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी चालले होते. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडवले. शेटिया यांनी कारमध्ये ठेवलेली पैशांची बॅग काढून घेण्याचा प्रयत्न चोरांनी केला.
शेटिया यांनी विरोध करताच गावठी कट्ट्याचा धाक दाखवून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. कारमधील चार लाख २२ हजार ३०० रुपयांची रोकड असलेली बॅग घेत चोरांनी पोबारा केला.
चोरट्यांच्या मारहाणीत शेटीया जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस आले. वैभव शेटिया यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews