अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- रात्रीच्या वेळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली पाच जणांची टोळी सुपा पोलिसांनी जेरबंद केली आहे.
या पाच दरोडेखोरांकडून दोन मोटार सायकल, रोख रक्कम, मिरचीपूड, एक धारदार सुरा असे साहित्य जप्त केले आहे. ही टोळी नगर-पुणे रोडवरील जातेगाव घाटात अटक केली.
याबाबत सविस्तर असे की सुपा पोलीस ठाण्याचे पथक नगर पुणे रोडवर गस्त घालत असताना जातेगाव घाटात काहीजण लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सुपा पोलिसांनी संबंधित ठिकाणी जात पाहणी केली असता, रस्त्याच्या बाजूला पाच जण न्यू बब्बी पंजाबी धाब्याच्याजवळ जातेगाव घाटात रस्त्याच्या कडेला अंधारात दबा धरून बसलेले आढळून आले.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे नयन राजेंद्र तांदळे (वय 26 वर्षे रा. भिस्तबाग चौक, अहमदनगर) विठ्ठल भाऊराव साळवे (वय 27 वर्ष ) अक्षय बाबासाहेब ठोंबरे (वय 23 वर्ष रा. प्रेमदान चौक अहमदनगर) राहुल अशोक पवार (वय 31 वर्ष रा. सुपा ता.पारनेर) अमोल छगन पोटे (वय 28 वर्ष रा.सुपा ता.पारनेर) अशी सांगितले.
या पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन मोटारसायकल (शाईन एमच 16 बीए 5640 व स्प्लेडर एमएच 16 एयु 3174) रोख रक्कम, मिरचीपूड व व एक धारदार सुरा असे साहित्य आढळून आले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved