पुण्यातून पळवलेली मुलगी नगर जिल्ह्यात सापडली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- पुरंदर तालुक्यातील कोळविहीरे गावातील अपहरण झालेल्या मुलीची अपहरणकर्त्याच्या ताब्यातून सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर यामधील आरोपींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान याबाबत समजलेली माहिती अशी कि, शनिवारी (दि.03) रोजी पुरंदर तालुक्यातील कोळविहीरे येथील राहणारी मुलगी तिच्या भावासोबत पुण्याहून घरी येत असताना दिवे घाटात असताना

स्वीप्ट गाडीतून आलेल्या चार तरुणांनी कोयत्याचा धाक दाखवत या मुलीचे अपहरण केले होते. अज्ञातांनी पळविलेल्या त्यामुलीला शोधण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनासमोर येऊन पडली होती.

दरम्यान पुणे जिल्यात अश्या प्रकरची घटना घडल्यामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले होते. घटनेची गंभीरता लासखात गेट पोलिस प्रशासनाने तात्काळ तपासाची सूत्रे फिरवून

आज अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथुन मुलीला व तिला पळवून नेणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment