अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : जिल्ह्यातील सर्वात कमी वयाचा कोरोना रुग्ण श्रीगोंद्यातील होता, याच अवघ्या दहा महिन्याच्या बाळाने कोरोनाला हरवून एक प्रकारचा विक्रमच केला आहे.
श्रीगोंदा फॅक्टरी येथील या दहा महिन्याच्या कोरोना पॉझिटिव बाळाला ठणठणीत झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
दहा दिवसांपूर्वी या बाळाला कोरोना झाला होता. घरातील त्याचा चुलता कोरोना पॉझिटिव आला आणि या बाळाला ही बाधा झाली.
त्यामुळे अनेकांच्या काळजाचे ठोके चुकले होते. मात्र आरोग्य यंत्रणेने या बाळाला कोरोनातून सहीसलामत बाहेर काढण्यात यश मिळविले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews