मुंबई :- महाशिवआघाडी स्थापन होण्याची चिन्हे दिसत असतानाच भाजपनेही सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली असून यासाठी मोठी जबाबदारी ही नारायण राणे यांच्यावर सोपवली आहे.
स्वतः नारायण राणे यांनीच पत्रकारांना सांगितले की, ‘राज्यात लवकरच भाजपचे सरकार येईल.’ मंगळवारी सायंकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी भाजप कोअर कमिटीची बैठक झाली. यात भाजपने वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याची माहिती
सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या बैठकीनंतर नारायण राणे यांची फडणवीस यांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेबाबत चर्चा केली. राणे म्हणाले, राज्यात भाजपचेच सरकार येणार. त्यासाठी जे काही करावे लागेल ते मी करणार आहे. मात्र, याबाबत मी जास्त माहिती देऊ इच्छित नाही. अन्यथा आमच्याकडे जे येणार आहेत ते थांबतील.