अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांनी आपल्या जीवाची बाजी लावत कार्य तत्पर राहून सामाजिक कार्य केले. अशा लोकांनाच कोव्हीड योद्धे असे नामकरण करून सन्मान जनसामान्यांनी केला .
आता यातील काही योध्यांचा सन्मान 15 ऑक्टोबर रोजी राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. यात डॉक्टर, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य कर्मचारी तसेच अधिकारी अशा राज्यभरातील 47 लोकांचा समावेश आहे.

यात नेवासा तालुक्यातील घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.बी.गुंजाळ व प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संदीप यळवंडे यांचा समावेश आहे.
दरम्यान नुकतेच कोरोना योद्धे म्हणून समाजाच्या विविध घटकांमध्ये काम करणार्या मुंबईतील डॉक्टर, पोलीस, स्वयंसेवी संस्था, स्मशानभूमीत काम करणारे कर्मचारी, सफाई कामगार,
वैद्यकीय सेवा देणारी सेवक अशांचा सन्मान स्पंदन आर्ट या संस्थेतर्फे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मागील महिन्यात राजभवनात सन्मान करण्यात आला. भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी हा उपक्रम राबवला होता.
15 ऑक्टोबरच्या कार्यक्रमात कोणाचा समावेश ? :- राज्यभरातील सार्वजनिक आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या आणि कोविड 19 साथ रोगाच्या लढ्यात योगदान देणाऱ्या डॉक्टर्स,अधिपरीचारिका, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, कक्ष सेवक-सफाईगार, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा स्वयंसेवीका, परिसेविका, औषध निर्माण अधिकारी, क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी यांचा समावेश आहे
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved