अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये कोरोनाचा जणू विस्फोट झाला आहे. संगमनेरमध्ये कोरोना संक्रमणाचे प्रमाण लक्षणीय आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा हा मतदारसंघ असून कोरोनाची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. हाच धागा पकडून भाजपकडून त्यांच्यावर गैरव्यवस्थापनाचा आरोप होत आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ येत्या गुरुवारी संगमनेरला रवाना होत आहेत. महसूल मंत्री थोरात यांचा हा तालुका असून संगमनेर नगरपालिका त्यांच्याच ताब्यात आहे.
त्यान्ची बहीण नगराध्यक्ष तर मेहूणे डॉ. सुधीर तांबे विधान परिषदेचे आमदार आहेत. या सर्वांनी वेळोवेळी आढावा बैठका घेतल्या. तरीही म्हणजे असे यश येताना दिसत नाही.
आतापर्यंत तेथे कोरोना बाधितांचा आकडा दीडशेपार गेला आहे. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी थोरात यांचे नाव न घेता
‘संगमनेर तालुक्यात अधिकाऱ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे आणि नियमाप्रमाणे काम करण्यास मोकळीक दिली जात नसल्याने तेथे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे,’ असा आरोप केला होता.
त्यापूर्वी एका कार्यक्रमात बोलताना थोरात यांनी कोरोनाशी यंत्रणा योग्य पदधतीने लढत असून बाहेरून येणाऱ्या नागरिकांमुळे तालुक्यात संसर्ग वाढत असल्याचे सांगितले होते.
आता याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री मुश्रीफ यांनी नगर जिल्ह्याचा दौरा आखला आहे. गुरूवारी ते कोल्हापरहून थेट संगमनेरला येणार आहेत. सकाळी ११ वाजता संगनेरला येऊन तेथे प्रथम संगमनेर तालुक्याची आढावा बैठक घेणार आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews