अहमदनगर जिल्ह्यातील ‘हे’ धरण झाले ओव्हरफ्लो

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनरेखा समजले जाणारे मुळा धरण आज सकाळी दहा वाजता ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुळा धरणातून 11 मोऱ्याद्वारे 2000 क्‍युसेकने जायकवाडीकडे पाणी सोडण्यास सुरुवात झाली. मुळा पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी कळ दाबल्यानंतर जायकवाडीकडे पाणी झेपावले.

26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणाच्या अकरा मोरया द्वारे पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. धरणाकडे 3000 पाण्याची आवक सुरू आहे.

मुळा धरणावर असलेला भोंगा वाजवल्यानंतर पाणी सोडण्यात आले. मुळा धरणातून पाणी विसर्ग सुरू झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी विद्युत मोटारी यापूर्वीच काढून ठेवल्या आहेत.

मुळा धरणातून पाणी सोडल्यामुळे परिसरातील विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे मुळा नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण

क्षमता असलेल्या मुळा धरणात आज अखेर 25 हजार 500 इतका पाणी साठा असुन 3 हजार क्युआने आवक सुरू असुन नदिपाञात दोन हजार क्युसेकने,

डाव्या कालव्याद्वारे मुसळवाडी तलावात 150 क्युसेक तर उर्जा निमिर्तीसाठी उजव्या कालव्याद्वारे 500 क्युसेकने पाणी सोडल्यात आले असल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment