अहमदनगर Live24 ,22 जून 2020 : लॉकडाऊन असतानाच नगर-दौंड महामार्गावरील हॉटेल फूड लँडमध्ये हुक्का पिऊन नशेत तर्रर्र झालेल्या उच्चभ्रू तरुण-तरुणींना अटक करण्यात आली.
शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. हुक्का पार्लर चालवणारा हॉटेलमालक अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नगर शाखेचा प्रमुख कार्यवाहक असून तो फरार झाला आहे.
सध्या हॉटेलचालकांना केवळ पार्सल सुविधा देण्याची परवानगी आहे. हॉटेलचालक चोरून-लपून ग्राहकांना हव्या त्या सुविधा देत आहेत. त्यात कलावंत म्हणून ओळख असलेल्या लोटके यांच्यासारख्या हॉटेलमालकांनी तर चक्क हुक्का पार्लर सुरू केले.
अ. भा. नाट्य परिषदेच्या नगर शाखेचे प्रमुख कार्यवाहक व ज्येष्ठ नाट्यकलावंत सतीश लोटके यांच्या नगर-दौंड रस्त्यावरील हॉटेल फूडलँडमध्ये तर चक्क हुक्का पार्लरची सुविधा पुरवण्यात येत होती.
नगर तालुका पोलिसांनी तेथे छापा टाकून नशेत तर्रर्र असलेल्या दोन तरुणींसह १८ ग्राहक व हॉटेल व्यवस्थापकाला ताब्यात घेतले.
श्रेयस संजय कोठारी, रमेश प्रमोद शहा, अभिषेक संचेती, आदित्य सतीश ईदानी, मोहित कृष्णकांत शहा, अंकित महेश लुणिया, अंकित अमृतलाल कोठारी, घनश्याम बारकू ठोकळ, किरण छगनराव निकम, गणेश संजय डहाळे,
रोहित नितीन शहा, दीपक जितेंद्र गिडवानी, यश कन्हैयालाल लुणिया, आदित्य गोरख घालमे, किरण विजय गुप्ता, किसन चंद्रकुमार माखिजा, अरुण बाबासाहेब डमडेरे, सतीश किसनराव लोटके व दोन तरुणींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
हॉटेलमध्ये बंद दाराआड हुक्का पार्लर आणि दारूविक्री सुरू होती. पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना संशय आल्याने हॉटेलची तपासणी केली तेव्हा आत बेधुंद पार्टी रंगली होती. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अनेक तरूण हे नगर शहरातील उच्चभ्रू घरातील आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews