अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव: नगर-मनमाड महामार्गावरून दुचाकीने जात असताना समोरून आलेल्या वाहनाने हुलकावणी दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नी पुलावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाली.
घटनेनंतर वाहनचालक फरार झाला आहे. रविवारी दुपारी सुरेगाव येथील भामाबाई राजेंद्र आसने (४०) व राजेंद्र कचरू आसने (४५) हे पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना जुनीगंगा देवी मंदिराजवळील पुलावर समोरून आलेल्या वाहनाने हुलकावणी दिल्याने ते तोल जाऊन दुचाकीसह पुलावरून पडले.
पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू आहेत.