अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- अहमदनगर महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांचे सख्खे बंधू चंद्रकांत मायकलवार ( वय ६५ ) यांचे सोलापूर येथे हृदयविकाराने निधन झाले आहे. आपला सख्खा भाऊ गेल्याचे समजले, पण त्याचवेळी शहरात एकाच दिवसात ५ कोरोना बाधित रुग्ण आढळले होते.
अशा परिस्थितीत आयुक्त मायकलवार यांनी नगर शहरातील जनतेची काळजी घेणे महत्वाचे मानत भावाच्या अंत्यविधीला न जाता कर्तव्याला प्राधान्य दिले. भावाच्या अंत्यविधीला जाण्याऐवजी नगरकरांना सुरक्षा पुरविण्यास प्राधान्य दिले आहे.
आधी कर्तव्य मग घर आणि परिवार असा विचार करणाऱ्या आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या कार्याला सलाम केला जाऊ लागला आहे. महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर पदभार घेण्यासाठी नगर शहरात आलेल्या आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना पुन्हा घरी जाता आलेले नाही.
त्यांनी १६ मार्च रोजी नगरला येवून आयुक्त पदाचा पदभार घेतलेला आहे. त्यानंतर अवघ्या २ दिवसांनी १ ९ मार्च पासून नगर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश व त्यानंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन झालेले आहे.
तेव्हापासून आयुक्त श्रीकांत मायकलवार हे नगर शहरवासियांसाठी कर्तव्य बजावत आहेत. त्यांचा परिवार सोलापूर येथे आहे. मात्र २ महिन्यापासून ते परिवारापासून दूर आहेत.
महापालिका प्रशासनाची धावपळ सुरु असताना आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना सोलापूरहून कुटुंबातील व्यक्तीचा फोन आला आणि त्यांचे मोठे बंधू चंद्रकांत मायकलवार ( वय ६५ ) यांचे सोलापूर येथे हृदयविकाराने निधन झाले आहे, अशी माहिती दिली.
त्यावेळी कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या परिसरात काय उपाययोजना करायच्या याबाबत आयुक्त मायकलवार हे विविध अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते.
ही माहिती समजल्यावर काही अधिकाऱ्यांनी त्यांना साहेब तुम्हाला बंधूच्या अंत्यविधीला जाणे आवश्यक आहे, असे सांगितले पण जे झाले आहे. त्याचा विचार करण्याऐवजी जे होवू नये हे पाहणे महत्वाचे असे सांगत त्यांनी घर आणि कुटुंबपेक्षा कर्तव्य महत्वाचे.
संपूर्ण नगर शहरच माझे कुटुंब आहे. त्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. चला कामाला लागा अशा सूचना त्यांनी दिल्या. हे पाहून उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com