नगर – जिल्हयातील श्रीगोंदा तालुक्यातील डोरजा परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील १४ वर्षे वयाच्या अल्पवयीन विद्यार्थीनीला सकाळी ७ च्या सुमारास पळवून नेले.
ढोरजा गाव शिवारात बाळू वाणी यांच्या लिंबोणीच्या शेताजवळ रस्त्याच्या कडेला सदर विद्यार्थीनी उभी असताना तेथे दोरजा गावात राहणारा आरोपी अक्षय संतोष गोरे हा आला व तो विद्यार्थीनीला शाळेत सोडतो असे म्हणत तिला दुचाकीवर बसवून घेवून गेला.
त्याने तिला तसेच पळवून नेले. याप्रकरणी मुलीच्या वडीलांनी बेलवंडी पोलीसात फिर्याद दिल्यावरून आरोपी अक्षय संतोष गोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पो. ना. पटारे हे पुढील तपास करीत आहेत. गावातच राहणाऱ्या अक्षय याने ओळखीचा गैरफायदा उठवत १४ वर्षाच्या विद्यार्थीनीला शाळेत सोडतो असे म्हणत पळवून नेले त्यामुळे ग्रामिण भागात व शहरातही विद्यार्थीनी व मुली किती असुरक्षित आहेत हे या घटनेतून समोर आले आहे.