अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- नगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून शहरात कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध महापालिकेने १ जूनपर्यंत वाढविले आहेत.
मागील १५ दिवस बंद असलेली किराणा दुकाने, भाजीपाला विक्री मर्यादित वेळेत खुली राहणार आहे. आयुक्त शंकर गोरे यांनी यासंदर्भात आदेश लागू केला आहे.

file photo
एक जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत हा आदेश लागू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशानुसार महापालिका क्षेत्रातील सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील.
या गोष्टी सुरु राहतील (वेळ) :-
- वैद्यकीय सेवा आणि औषध दुकाने अत्यावश्यक सेवेसाठी
- पेट्रोल पंप नियमित वेळेनुसार सुरू
- घरपोहोच गॅस वितरण सेवा
- सर्व बँका
- दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री
- पशुखाद्य विक्री : सकाळी ७:०० ते ११:०० सुरु राहील.
- किराणा दुकाने : सकाळी ७:०० ते ११:०० वाजेपर्यंत
- भाजीपाला व फळे बाजार मालाची खरेदी-विक्री : सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु राहील.
- अंडी, मटन, चिकन व मत्स्य खरेदी-विक्री : सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु राहील.
- कृषी विषयक दुकाने (विक्री दुकाने), कृषी सेवा केंद्रे : सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत आणि पुरवठा वाहतूक सकाळी ११.०० ते दुपारी १.०० पर्यंत सुरु राहील.
तर दंडात्मक कारवाई :- नियमांचे उल्लघंन केल्यास प्रथम पाच हजार रुपये दंड आकारला जाईल. दुस-या वेळेस पुन्हा पाच हजार रुपये दंड आकारुन दुकान सील केले जाईल.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|