अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील कुकडी नदीपात्रात निघोज कुंडावर आढळून आलेल्या बेवारस मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पारनेर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांकडून विविध शक्यता पडताळून पाहिली जात असली तरी अदयाप त्यांच्या हाती ठोस काही लागलेले नाही.
दरम्यान, त्या व्यक्तीचा बेल्टने गळा आवळून खून करण्यात आला व त्यानंतर मृतदेह धान्याच्या कोठीमध्ये कोंबून तो कुकडी नदीपात्रात फेकून दिल्याची माहीती पुढे आली आहे. दि. 27 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतिन वाजण्याच्या सुमारास कुकडी नदीपात्रामध्ये धान्याच्या कोठीमध्ये मृतदेह असल्याचे आढळून आले होते.
पारनेर पोलिसांनी घटनास्थळी जाउन मृतदेह नदीबाहेर काढला. पुणे येथील ससून रूग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी तो पाठविण्यात आला आहे. दरम्यान मृतदेह कोठीबाहेर काढल्यानंतर त्या व्यक्तीचा कमरेच्या बेल्टने गळा आवळून खून करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
गळा आवळण्यासाठी वापरण्यात आलेले बेल्ट गळयाभोवती तसाच होता. साधारण 40 ते 45 वर्षे वयाच्या या व्यक्तीच्या अंगावर केवळ अंडरवेअर व बनियन असल्याने मृतदेहाची ओळख पटविण्यात अडचणी येत आहे. कमरेला व हातात काळा दोरा असलेल्या या व्यक्तीचे दात पडल्याचे दिसून येत असून
त्यास बेदम मारहाण करून गळा आवळून त्याचा खून करण्यात आला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी विविध पोलिस ठाण्यात बेपत्ता व्यक्तींचीही शहानिशा करण्यात येत असून आता पर्यंततरी त्यास यश आलेले नाही.
पोलिस प्रशासनातील जानकारांच्या मते ही व्यक्ती परजिल्हा, किंवा परराज्यातील असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून एखादया हॉटेल किंवा ढाब्यावरील तो कामगार असावा असे सांगितले जात आहे. विविध हॉटेल अथवा ढाब्यांवर अशा प्रकारच्या धान्याच्या कोठया सामान ठेवण्यासाठी वापरण्यात येतात. त्या अनुषंगानेही पोलिस तपास करीत आहेत.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved