अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- तालुक्यातील आदिवासी शेतमजुराच्या मृत्युचे गूढ वाढत चालले आहे. एका शेतकऱ्याने केलेल्या तक्रारीनंतर खोदकाम करून सुभाष निर्मळ याचा मृतदेह शनिवारी बाहेर काढला होता.
या आदिवासी मजुराच्या मृत्यूप्रकरणी अनेक प्रश्न उभे राहत असल्याने या प्रकरणाचे गूढ वाढतच चालले आहेत, तर तपासावरही संशय निर्माण होऊ लागला आहे.
मृत सुभाष निर्मळ (वय ५०) हा मूळचा श्रीरामपूर तालुक्यातील निर्मळ पिंप्रीचा आहे. तो देवगाव शिवारात खराडे वस्तीवर मजुरीसाठी अनेक वर्षांपासून स्थायिक झाला होता.
असिम गोरक्षनाथ अभंग या कुकाण्यातील शेतकऱ्याची शेतजमीन भेंडे शिवारात आहे. याच शेतजमिनीत तीन-चार जणांनी आपल्या शेतात जेसीबी यंत्राच्या मदतीने खड्डा खणून काही तरी पुरले, अशी तक्रार अभंग यांनी कुकाणे पोलिसांत केली.
या तक्रारीनुसार खड्डा खणला असता त्यात सुभाष निर्मळ याचा मृतदेह आढळून आला. कुकाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रामेश्वर शिंदे यांनी जागेवरच उत्तरीय तपासणी केली.
रविवारी पोलिसांनी मृत सुभाष याची मुलगी दीपाली नितीन जाधव (रा. तरवडी, हल्ली गणपत खराडे यांची वस्ती,) हिचा लेखी जबाब घेतला. मात्र या जबाबाने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
सुभाष निर्मळ यास श्वसनाचा त्रास हाेत असताना त्यास अवघे दोन किमी अंतरावर असलेल्या कुकाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात का दाखल केले नाही.
तसेच सुभाषच्या मृत्युची सरकारी यंत्रणेला माहिती न देता तो मृतदेह लगतच्या शेतातच का पुरला, याचाही उलगडा पोलिसांना करावा लागणार आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com