अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 : काल अकोले तालुक्यात एका तरुणाचा खून करून मृतदेहाचे तुकडे करत गोण्यात भरून नदीच्या पात्रात फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली होती. वाकी शिवारात एका अद्यात तरुणाचा खुन त्याच्या मृतदेहाचे तुकडे येथील कृष्णावंती नदीच्या पात्रात फेकून दिले होते.
त्या तरुणाच्या खुनाचे रहस्य उलगडले असून मयत तरुणाच्या मामा व आजोबानेच त्याचा खून करून चक्क कोयत्याने त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट लावल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय
पोलिसांनी मृत तरुणाची ओळख पटवून दोन आरोपीना अटक केली आहे. अवघ्या काही तासात या गुन्ह्याचा छडा लागला असून हा मयत व्यक्ती अकोले तालुक्यातील खिरविरे येथील असून प्रदिप सुरेश भांगरे (वय 25) असे मयताचे नाव आहे.
तर त्याचा खून करणारे कमलाकर हनुमंत डगळे (वय 70) व हरि कमलाकर डगळे (दोघेे, रा. खिरविरे) अशी आरोपींची नावे आहेत. प्रदिप भांगरे हा कमलाकर डगळे याच्या मुलीचा मुलगा आहे.
त्याचे आणि कमलाकर याचे गेल्या चार महिन्यापुर्वी किरकोळ वाद झाले होते. तेव्हा या मुलाने त्याच्या मानगुटीवर पाय दिला होता. तेव्हा कमलाकर मोठ्याने ओरडला म्हणून त्यांने त्यास सोडले. हा सर्व प्रकार केवळ दारुच्या पैशासाठी झाला होता. दरम्यान गेल्या दोन-तीन दिवसांपुर्वी यांच्यात पुन्हा वाद झाले होते.
तेव्हा प्रदिप याने कमलाकर यास मारहाण केली होती. हा राग त्याला आला होता. त्याने या नातवाला एकटे पाहून त्याच्या डोक्यात कोयत्याचा घाव घातला. त्याचे घरातच तुकडे केले.
दरम्यान प्रदिपला मारुन टाकल्यानंतर त्यांची विल्हेवाट कशी लावायची हे त्यांना समजेनासे झाले. तो नातू मयत झाल्यानंतर त्याने यातून बजाव करण्यासाठी त्याचा मुलगा हरि कमलाकर यास घडलेला प्रकार सांगितला.
त्यानंतर या दोघांनी मिळून प्रदिपच्या मृतदेडाच्या खांडोळ्या करीत दोन गोण्यांमध्ये भरल्या आणि सुमसाम परिस्थितीत पाहत यांनी हा मृतदेह वाकी परिसरातील कृष्णावंती नदीत नेवून टाकला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews