अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- राम मंदिर उभारण्याचा मुहूर्त अखेर ठरला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे.
हाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. शरद पवारांच्या या टीकेनंतर भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील शरद पवारांनी केलेल्या राम मंदिराच्या विधानावरुन निशाणा साधला आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2019/09/sujay-vikhe-patil.jpg)
खा. शरद पवार म्हणाले होते ‘कोरोना हे देशावरचे मोठे संकट आहे. त्यावर यशस्वीपणे मात करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार एकत्रित आले पाहिजे. एकमेकांशी योग्य समन्वय साधून काम झाले पाहिजे.
कोरोनाचे भयसंकट परतवून लावण्यासाठी कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे, हे प्राधान्याने ठरविले पाहिजे. परंतु, मंदिर बांधून कोरोनाचं संकट दूर होईल, असं काही मंडळींना वाटतं आहे.
राम मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा. फक्त कोरोनाचं संकट दूर व्हावं हीच आमची इच्छा आहे.’ यावर निशाणा साधत खा. सुजय विखे यांनी खा.पवार यांच्यावर टीका केली आहे.
राष्ट्रवादीचे कित्येक आमदार आणि मंत्री दररोज वेगवेगळ्या रस्त्यांचे भूमिपूजन, उद्घाटन करतात. त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे त्यांनी भूमिपूजन थांबवावी.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. त्यानंतर आम्हाला सल्ले द्यावे असा टोला सुजख विखे पाटील यांनी लगावला आहे. राम मंदिर आपल्या देशाच्या आस्थेचा प्रश्न असून त्याचा आम्हाला अभिमान आहे.
त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपाला सल्ला देण्यापेक्षा उद्घाटनासाठी गर्दी जमवत असलेल्या नेत्यांना नियंत्रणात आणावे, असा टोला सुजय विखे यांनी लगावला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा