अहमदनगर जिल्ह्यातील ‘तो’ जावई झाला कोरोनामुक्त !

Published on -

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :  पारनेर तालुक्यातील म्हसणे येथील जावयाने कोरोनावर मात केली. मंगळवारी दुपारी त्यास घरी सोडण्यात आले. १८ मे रोजी जावई कुटुंबासह म्हसणे येथे आला होता.

घराजवळच त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. तरुणास श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने मालवाहू वाहनातून पळवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यास पारनेर येथील रुग्णवाहिकेतून नगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची पत्नी, मुलीचे तसेच रुग्णवाहिका चालकाचे अहवाल निगेटिव्ह आले होते.

त्याचे सासू, सासरे पारनेरच्या कोविड केअर सेंटरमध्ये, तर १८ नातेवाईक घरात विलगीकरणात ठेवण्यात आले होते.

संपर्कातील नागरिकांना बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाल्यापाठोपाठ आता बाधित तरुणही कोरोनामुक्त झाल्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe