अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने आपला फास आवळायला सुरुवात केली आहे. जवळपास अहमदनगर जिल्ह्यात ३ हजार पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.
विविध शासकीय कार्यालयांत कोरोनाने एंट्री केल्यानंतर आता पोलीस यंत्रणेलादेखील कोरोनाने आपल्या कवेत घेण्यास सुरुवात केली आहे.
शहर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक व एक पोलीस हवालदार यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना क्कारंटाईन करण्यात आले आहे.
हे उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी काही दिवस दंगल नियंत्रण पथकासोबत होते. यामुळे किंवा पोलीस ठाण्यात येणार्या-जाणार्या लोकांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोना संक्रमण झाले असल्याची माहिती आहे.
अहमदनगरमध्ये कोरोना संक्रमणाचा वेग वाढतच चालला आहे. या काळामध्ये पोलिस प्रशासन कोरोनायोध्याची भूमिका खूप शानदार पार पाडत आहेत. परंतु या दरम्यान पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना कोरोनाबाधित झाले आहेत.
गेल्या चार महिन्यापासून पोलीस दलात कोरोना रूग्ण आढळून आले नव्हते. परंतू, काही दिवसांपूर्वी मुख्यालयातील एका सहाय्यक फौजदाराला कोरोनाची लागण झाली होती.
यात या सहाय्यक फौजदाराचा मृत्यू झाला. शहर पोलीस दलातील एक सहाय्यक पोलीस निरीक्षक व दंगल नियंत्रण पथकातील चार पोलीस करोना पॉझिटीव्ह आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
आता पुन्हा शहर पोलीस दलातील एक पोलीस उपनिरीक्षक व एक पोलीस कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा