अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाने अनेक जलसाठे भरण्याच्या मार्गाकडे आहेत.
त्यामुळे नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने विविध सूचना देत सतर्कतेचा इशारा दिला आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2020/08/d7v1cew-5a49826a-49e2-48f7-b608-793f0c2610e3.jpg)
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑगस्ट रोजी रोजी सकाळी 10 वाजता जिल्हयातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत नाशिक जिल्हयातील नांदूरमधमेश्वर बंधा – यातून 19,490 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे.
भिमा नदीस दौड पुल येथे 29,465 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच भंडरदरा धरणातून प्रवरा नदी पात्रात 3,268 क्युसेक पाण्याचा विसर्ग विसर्ग सुरु आहे .
सिना धरणातून सिना नदीपात्रामध्ये 20 क्युसेक पाण्याचा विसर्ग विसर्ग सुरु आहे . धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठयात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
आगामी काळात अहमदनगर तसेच नाशिक व पुणे जिल्हयात पावसामुळे वा धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ झाल्यास प्रवरा , गोदावरी , भिमा , सिना या नदयांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे येथील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे, सखल भागात राहणा – या नागरीकांना तातडीने सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावेत,
नदी , ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे, तसेच पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासुन दुर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे,
नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये, पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये, जुनाट / मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये,
अतिवृष्टीमुळे भूसख्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहण्या – या लोकांनी दक्षता घ्यावी वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे, घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे,
धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा – या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये, धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये,
धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये आदी सूचना प्रशासनाने केल्या आहेत. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय , पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा,
तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्वनी क्र .1077 ( टोल फ्री ) , 0241 2323844 / 2356940 वर संपर्क साधावा असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved