जिल्ह्यातील ‘ह्या’ बाजार समितीत कांद्याला ५ ते ६ हजार रुपये भाव

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यावर रविवारी एक नंबर कांद्याला ५ ते ६ हजार रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला. मोढ्यांवर ४ हजार २३६ गोणी कांद्याची निच्चांकी आवक झाली होती.

मोंढ्यावर दोन नंबर कांद्याला ३ हजार ते ४९९५ रूपये, तीन नंबर कांद्याला ५०० ते २९९५ रुपये, तर गोल्टी कांद्याला ४ हजार ५०० ते ५ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला आहे.

मोढ्यांवर राहुरी तालुक्यातील म्हैसगाव, वरवंडी, बाभुळगाव, उंबरे, ब्राम्हणी, श्रीरामपूर, राहाता भागातील शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता.

मोंढ्यावर गावरान कांद्याची आवक कमी झाली असून बाजारभावात मोठी तेजी येण्याची दाट शक्यता आहे. ४५ गोणी कांद्याला ७ हजार रुपये भाव राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती मोंढ्यावर ५ गोणी कांद्याला ७ हजार ५०० रुपये,

८ गोणी कांद्याला ७ हजार १०० रुपये, ४५ गोणी कांद्याला ७ हजार रुपये, ७ गोणी कांद्याला ६ हजार ९०० रुपये, १७ गोणी कांद्याला ६८०० रुपये, ५६ गोणी कांद्याला ६ हजार ७५० रूपये, ९ गोणी कांद्याला ६ हजार ७२५ रुपये प्रतिक्विंटल अपवादात्मक बाजारभाव मिळाला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment