अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-नगर शहराची पाण्याची गरज लक्षात घेता मुळा धरणापासून ते पंपिंग स्टेशनपर्यंत अधिक क्षमतेची एक हजार मिलिमीटर व्यासाची नवीन पाईपलाईन बसवणे गरजेचे आहे.
त्यामुळे नगर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटणार आहे. दरम्यान, डॉ. खा. सुजय विखे पाटील, महापौर बाबासाहेब वाकळे, मनपा पाणी पुरवठा विभाग यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी अमृत पेयजल योजनेअंतर्गत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा व नागरिकांना 24 तास स्वच्छ पाणी मिळावे,
यासाठी खा. डॉ. विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन महापौर वाकळे यांच्या समवेत पाणीपुरवठा, जलसंधारण खात्याच्या अधिकार्यांची बैठक घेऊन शहरासाठी होणार्या पाणीपुरवठा व केंद्र सरकारच्या अमृत पेज योजनेबाबत एक महत्वपूर्ण बैठक घेतली.
नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही यासाठी आखण्यात आलेले हे काम करतांना संबंधित विभागाला दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीचा वेळ लागणार असून 19 ते 30 जानेवारीपर्यंत शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.
तसेच या कालावधी दरम्यान शहराला दोन, तीन दिवसाआड पाणी पुरवठा होणार असल्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved