बोगस जमीन विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश …’या’ वकिलाचा होता समावेश !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 :  श्रीगोंदा तालुक्यात बनावट आधारकार्ड व इतर कागदपत्रे दाखवून जागेचे मूळ मालक असल्याचे भासवून येणाऱ्या गिऱ्हाईकाना बोगस शेतजमीन , प्लॉट यांचे खरेदीखत व ईसार पावती बनवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून काही आरोपींना अटक करून त्यांच्या इतर साथीदारांवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

श्रीगोंदा तालुक्यात अश्या प्रकारे अनेक नागरिकांची बनावट कागद पत्राद्वारे फसवणूक झाल्याने पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दि.१२ जून रोजी अण्णासाहेब आप्पाजी तोरडे यांनी अश्याच प्रकारे फसवणूक झाल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर तपास स्वतःकडे घेऊन आठच दिवसात या टोळीचा कारनामा उघड करत १५ जून रोजी भगवान छबू राऊत बोरुडेवाडी श्रीगोंदा , नवनाथ मारुती भुजबळ रा . शिक्रापूर , ता . शिरूर यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी एस. एस.साबळे रा.बारामती, रामभाऊ पाराजी कौठाळे रा .श्रीगोंदा , मारुती नाना गव्हाणे रा . घुटेवाडी, संपत उबाळे रा . हिंगणी, संतोष कोंडीबा वाखारे रा . हिंगणी , बापू बलभीम निंभोरे ( रा . घोटवी , सत्यवान मारुती गव्हाणे रा . घुटेवाडी, ता. श्रीगोंदा यांची नावे उघड केल्याने या सर्वांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment