अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात तीन दिवसापासून पिसळलेल्या कुत्र्याने दहशत केली असून त्याच्या प्रकोपास अनेकांना बळी पडावे लागले आहे.
या कुत्र्याने अद्यापपर्यंत पाच ते सात लहान मुलांना चावा घेतला आहे. कोरोना संसर्गाचा कहर सर्वत्र सुरु असल्याने नागरीक आधीच त्रस्त आहेत.
त्यातच शहरातील पिसाळलेल्या कुत्र्याच्या दहशतीमुळे नागरीकांना घराबाहेर पडणे जिकरीचे झाले आहे. कुत्रा चावल्यानंतर त्यावर उपचारासाठी असणारी अँन्टी रेबीजची लस शेवगाव येथे उपलब्ध नाही.
त्यामुळे संबंधीतांच्या नातेवाईकांना ती थेट नगर येथून उपलब्ध करावी लागते. त्यामुळे नगरपालिकेनी याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांनी केली आहे.
या कुत्र्याने अद्यापर्यंत श्रेयस मनोज लांडे (वय ६) हा गुरुवारी (ता. १) घरासमोरील अंगणात खेळत असतांना पिसाळलेल्या कुत्र्याने त्यावर हल्ला करत सर्व अंगावर चावा घेतला.
शुक्रवारी (ता. २) उमर शहानवाज कुरेशी (वय- ७) व दारुवाला गल्लीतील अजवा आबुबकर शेख (वय- ८) या मुलीला ही पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला.
या व्यतिरीक्त शहरातील वेगवेगळ्या प्रभागातील अनेक जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला असून शहरात दोन तीन दिवसात या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved