अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- गेल्या तीन वर्षापासून बाजार समितीचे बंद असलेले मुख्य गेट तात्काळ उघडण्यात यावे असा आदेश सुरक्षा समितीचे अध्यक्ष खा.सदाशिव लोखंडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना पत्र पाठवून केले आहे, अशी माहिती भाजपचे जेष्ठ नेते वसंत लोढा यांनी दिली.
वसंत लोढा यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन खासदार सदाशिव लोखंडे यांनी पाठवलेले पत्र त्यांना देऊन चर्चा केली.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायतच्या निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर रस्ते सुरक्षा समितीची स्वतंत्र बैठक घेऊन कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी व्यापाऱ्यांना दिले.
यावेळी वसंत लोढा म्हणाले, बाजार समितीचे गेटची एक बाजू मागील तीन वर्षापासून बंद करण्यात आलेली आहे. सदर गेट बंद असल्याने व्यापारी, नागरिक यांची मोठी गैरसोय होत आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved