राहुरी :- तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने रस्त्याने जाणाऱ्यांच्या काळजाचा काही काळ थरकाप उडाला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली.
नगर-मनमाड मार्गावरील पाण्याच्या टाकीजवळील चौकात सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. स्विफ्ट, एक्सयुव्ही व टेम्पो ही तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने मोठा आवाज झाला.
मात्र, वाहनांचे नुकसान वगळता प्रवाशांना कुठलीही दुखापत झाली नाही. टाकीजवळील चौकात नगर परिषदेच्या बंद पडलेल्या सिग्नलजवळील गतिरोधक सपाट झाल्याने वाहनांच्या वेगावर मर्यादा येणे थांबले आहे.
या गतिरोधकाजवळील सिग्नल गेल्या पाच वर्षांपासून धुळखात पडून आहेत. दोन वर्षांपूर्वी याच सिग्नलजवळ अपघाताच्या दोन घटनांत डझनभर लोकांचा जीव गेला होता.