दोन गट परस्पर भिडले; अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा प्रकार राहाता तालुक्यातील वाकडी येथे घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास शेतात पाणी भरण्यासाठी गेलो असता, तुम्ही आमच्या शेतात यायचे काही कारण नाही, असे म्हणून आरोपी बाबासाहेब हरिभाऊ काळे,

अनिल हरिभाऊ काळे, बाळासाहेब हरिभाऊ काळे, संजय नारायण काळे, नारायण विठ्ठल काळे, हरिभाऊ विठ्ठल काळे यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले.

याबाबत पोपट विठ्ठल काळे यांनी फिर्याद दिली आहे. दुसरी फिर्याद बाळासाहेब हरिभाऊ काळे यांनी दिली आहे. त्यात म्हटले आहे की, आरोपी मच्छिंद्र विठ्ठल काळे, पोपट विठ्ठल काळे, विजय अंबादास काळे, सविता विजय काळे, अरूण मच्छिंद्र काळे यांनी शेतातील मोटारीच्या पाईपचे नुकसान केले.

याचा जाब विचारला असता, राग येऊन त्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली व लाकडी खोर्‍याच्या दांड्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या दोन्ही फिर्यादींवरून वरील आरोपींविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अशोक अडागळे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment