अकरा वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-   राहुरी तालुक्यातील चिखलठाण येथे मंगळवारी दुर्दैवी घटना घडली. अकरा वर्षाची मुलगी कपडे धुण्यासाठी नदीवर गेली असता पाय घसरुण मुळा नदीच्या पाण्यात पडली.

यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. आश्विनी संपत पवार ( वय ११, रा. चिखलठाण ) असे मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे. कपडे धुण्यासाठी आश्विनी नदीवर गेली होती.

ती लवकर घरी न आल्याचे आजोबा नामदेव पवार यांच्या लक्षात आले. त्यांनी नदीवर जावून पाहणी केली असता ती पाण्यात पडल्याचे लक्षात आले.

नंतर नदीच्या पाण्यामध्ये बुड्या मारून मृतदेह शोधून काढला. सांयकाळी मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी येथील सरकारी रुग्णालायात पाठवण्यात आला.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment