अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या मुलाने आमच्या कुटुंबाला पत्रकार बाळ बोठेपासून धोका असल्याचं म्हणत पोलीस अधीक्षकांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. जरे यांच्या घरात बोठे विरुद्ध लिहिलेले पत्र पोलिसांच्या हाती लागल्यानं या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे.
त्यामुळे बोठे याच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या रेखा जरे हत्याकांड प्रकरणात खून होण्यापूर्वी रेखा जरे यांनी लिहून ठेवलेले चार पानी पत्र पोलिसांच्या हाती लागले असून, त्यात धक्कादायक बाबींचा उल्लेख आहे.
सामाजिक कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या रेखा जरे यांचा नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात निर्घृण खून झाला होता. सामाजिक कार्यात कार्यरत असलेल्या महिला कार्यकर्तीचा खून झाल्यामुळे जिल्हाभर खळबळ उडाली होती. या खून प्रकरणाचा मुख्य सुत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे असल्याचे
समोर आल्यानंतर बोठे याच्याबाबत एक गंभीर बाबी समोर येऊ लागल्या आहेत. बोठे अद्याप फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. याच दरम्यान, या खून प्रकरणाचा तपास असलेले पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी रेखा जरे यांच्या घरामध्ये आणखी काही पुरावे मिळतात का, याचा शोध घेतला.
त्यामध्ये रेखा जरे यांनी लिहून ठेवलेले चार पानी पत्र पोलिसांच्या हाती लागले. जरे यांच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली. या वेळी पोलिसांना महत्त्वाचे पुरावे सापडल्याचे सूत्रांनी सांगितले. तपासादरम्यान खुद्द जरे यांनी लिहिलेलं चारपानी पत्र पोलिसांच्या हाती लागलं आहे.
या पत्रात बाळ बोठे हा रेखा जर यांचा कशा प्रकारे शारीरिक आणि मानसिक छळ करायचा हे त्या पत्रात लिहिलं असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. तर पोलिसांनी पंचनामा करून हे पत्र ताब्यात घेतले असून, हे पत्र बोटे यांच्याविरोधात सबळ पुरावा ठरू शकतो.
सध्या बोठेंविरोधात दररोज वेगवेगळी पत्र पोलीस अधीक्षकांकडे येत आहेत. तर जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने देखील पोलिसांना पत्र लिहिले आहे. माझी आई रेखा भाऊसाहेब जरे हिची हत्या झाली असल्याने या घटनेतील सर्व आरोपी तसेच मुख्य सूत्रधार बाळ बोठे यांच्याकडून आमच्या जीविताला धोका असल्याने आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे,
असं त्या पत्रात त्यानं नमूद केलं आहे. दरम्यान ह्या हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार बोठे याने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया आज झाली. त्यावर आरोपीच्या वकीलांचे मत ऐकून घेण्यात आले. तसेच पोलिसांचे मत यावर मागविण्यात आले असून, यावर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये