अहमदनगरच्या तरुण अभियंत्यांनी देशाची गरज लक्षात घेऊन केले व्हेंटिलेटर तयार !

Published on -

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नगरच्या झीन मेडिकल इक्विपमेंट्‌स या फर्ममध्ये श्रीपाद पुणतांबेकर आणि गणेश जोशी या दोन अभियंत्यांनी व्हेंटिलेटर तयार केले आहे. भारतीय बनावटीच्या तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेवून नगरमधील दोन अभियंते मागील दोन वर्षापासून परिश्रम घेत होते.

त्यांच्या चिकाटीला, परिश्रमाला यश आले असून त्यांचे व्हेंटिलेटर आज रुग्ण सेवेसाठी तयार आहे. पुणतांबेकर हे मकेनिकल इंजिनियर असून व्हेंटिलेटर विक्री आणि पश्‍चात सेवा क्षेत्रात त्यांना बारा वर्षाचा अनुभव आहे.

तर गणेश जोशी हे इलेक्‍ट्रॉनिक इंजिनियर असून त्यांना प्रोग्रामिंग आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स विषयात नैपुण्य आहे. अशा या दोन अनुभवी व्यक्तीने एकत्र येवून आपले अनुभव आणि कसब वापरुन वैद्यकीय क्षेत्राची गरज लक्षात घेवून व्हेंटीलेटर तयार केले आहे.

व्हेंटिलेटर ही एक अतिशय क्‍लिष्ट प्रणाली असून व्यक्तीच्या जीवनाशी निगडित अशी हि बाब लक्षात घेवून अतिशय मेहनतीने या दोन अभियंताने ही जबाबदारी पूर्ण केली आहे. मशीनसाठी लागणारे इलेक्‍ट्रॉनिक सर्किट आणि प्रोग्रामिंग याची जबाबदारी जोशी यांनी घेतली तर मशीनचे डिझाईन,

त्याची कार्यप्रणाली मेकॅनिकल व्हॉल्वची संरचना पुणतांबेकर यांनी केली आहे. या व्हेंटीलेटरमध्ये आधुनिक पद्धतीच्या मोड सुद्धा दिलेल्या आहेत.वापरयला सुलभ असे मशीन हे आहे. या व्हेंटिलेटरमध्ये आधुनिक मोड सुविधा आहेत.

आधुनिक टरबाइन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने मशीनचा आकार लहान आहे.देशात आलेल्या आपत्ती जनक स्थितीमध्ये झीन मेडिकल, प्रशासनाच्या सोबत असून गरजेप्रमाणे व्हेंटिलेटर पुरविण्यास तयार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe