संगमनेर – संगमनेर खुर्द परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील १७ वर्ष ३ महिने वयाच्या अल्पवयीन तरुणीस काल राहत्या घरातून दुपारच्या दरम्यान अज्ञात आरोपीने कायदेशीर रखवालीतून काहीतरी फूस लावून अज्ञात कारणासाठी पळवून नेले.
मुलीच्या वडिलांनी संगमनेर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध भादवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने पालक वर्गात खळबळ उडाली आहे.