कारच्या धडकेत युवक जागीच ठार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :-नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकाजवळ झालेल्या अपघातात उस्थळ दुमाला येथील युवक प्रतीक शिवाजी बदलले ( वय 24)याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना नुकतीच घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, प्रतीक हा नेवासा फाटा येथील विठ्ठल वस्त्र दालना समोरून गाडी रस्त्याकडे वळवत असताना पाठीमागून आलेल्या वॅगन आर कारचालकाचा वेग नियंत्रणात न आल्याने

सदर युवकाचा गाडीला जोराची धडक बसली. आणि त्यात युवकाचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान प्रतीक याच्या अकाली अपघाती निधनाने परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe