…तर अहमदनगर मध्ये आलेल्या ‘त्या’महिलेचा जीव वाचला असता …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- राशीन येथे लेकीच्या घरी आलेल्या महिलेचा मृत्यु झाल्यानंतर अहवाल कोरोना पॉझिटिव आला.

मात्र याच महिलेला 16 मे रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते त्यावेळी आरोग्य यंत्रणेने त्या महिलेच्या घशाचा स्त्राव घेतलाच नसल्याची माहिती हाती आली आहे.

हा हलगर्जीपणा आता कर्जतकरांचा अंगलट येण्याची भीती आहे. मुंबईच्या वाशी येथून ही महिला लॉक दाऊनच्या काळात कशी आली हा महत्वाचा प्रश्न असतानाच या महिलेबाबत प्रशासनाची बेपर्वाही स्पष्ट जाणवते.

सदर महिला राशीन येथे आल्यानंतर तीन ते चार दिवसांनी तीला ताप येऊन घसा दुखत असल्याचे लक्षात आले. तीला दम लागत असल्याने स्थानिक आरोग्य यंत्रणेने त्या महिलेला कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

पण शंका आल्याने सदर महिलेला लगेच नगरला हलविले. मात्र नगरच्या यंत्रणेने हा विषय गांभीर्याने घेतलाच नाही. तिच्या घशाचा स्त्राव न घेताच परत पाठविले आणि येथेच आरोग्य यंत्रणा चुकली.

मुळात त्यावेळी स्त्राव का घेतला नाही हा प्रश्न आहे. त्या महिलेला कोरोनाची सगळी लक्षणे असतानाही तिला परत पाठवले. आणि आता ती कोरोनाने दगावल्यानंतर उपाय सुरू केले.

दरम्यान कोरोनाबाधित महिलेच्या तेरा नातेवाईकांना तपासणीसाठी नगरला हलविण्यात आले असून आज संपर्कात आलेल्या अजून काही लोकांना पाठविले जाणार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment