कोरोनामुळे मरणानंतरही सुटका नाही ! वाचा काय होतोय हे अहमदनगरमध्ये …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :-  सध्या अहमदनगर शहरात कोरोनाचा चांगलाच फैलाव झाला आहे, कोरोना रुग्णांना बेड उपलब्धतेसाठीही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अक्षरशः मरणानंतरही त्रासातून सुटका होत नसून अंत्यसंस्काराविना मृतदेह दोन तीन दिवस जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवावे लागत आहेत.

कोरोना मयतांवर विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्याचे शासनाचे आदेश आहेत. नगरच्या अमरधाममध्ये एकच विद्युतदाहिनी असल्याने मनपाकडून कोविड मयतांवरही अग्निसंस्कार करण्यात येत आहे.

इतर गोष्टींनी मयत झालेल्यांचे तसेच कोविड मयतांचे दहन एकाच जागी जवळ जवळ केले जात आहे. अंत्यसंस्काराच्या नावाखाली मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे काम मनपाकडून होत आहे.

आज शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी थेट अमरधाम येथे जाऊन या प्रकाराचा पर्दाफाश करून मनपाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला.

शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर अभिषेक कळमकर, दत्ता जाधव, गिरीश जाधव, आदी यावेळी उपस्थित होते.

नगरमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मयतांची संख्या वाढत असल्याने अमरधाममध्ये अंत्यसंस्कारालाही विलंब होत आहे. एकाच विद्युतदाहिनीवर ताण येत आहे.

अशावेळी करोना मयतांवरही दाह संस्कार करून धोका निर्माण करण्याचे काम मनपाकडून होत आहे. दुहरी विद्युतदाहिनी सुरु करुन करोना मयतांचे तिथेच अंत्यसंस्कार करणे आवश्यक आहे. परंतु मनपा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment