अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच धक्कादायक बाब म्हणजे चक्क महसूलमंत्र्यांच्या तालुक्यातच वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहे.
दरम्यान शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. घरफोड्या होत असतानाही पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. वर्षाचे सण उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. खरेदीसाठी नागरिकांकडून पैसा जवळ बाळगण्यात येत आहे,
मात्र वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांना चांगलाच आर्थिक फटका बसत आहे. शहरात भुरटे चोर वाढले आहेत. घरफोड्या करण्याचे काम हे चोरटे करत आहेत.
शहर पोलीस ठाण्यात रात्रपाळीत काम करणार्या पोलीस कर्मचार्यांचे शहरात दुर्लक्ष होताना दिसत आहे. यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावले आहे.
दोन दिवसांपूर्वी शहरामध्ये एकाच दिवशी सात ठिकाणी घरफोड्या झाल्या. शहर पोलिसांनी याची कुठलीही दखल घेतली नाही. पोलीस अधिकारी यांचेही घरफोड्यांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात रात्र पाळीत मोजकेच कर्मचारी काम करत असतात. गस्त घालणारे कर्मचारी संपूर्ण शहरात गस्त घालत नसल्याचे दिसत आहे.
यामुळे रात्री चोर्या वाढल्या आहेत. संगमनेरात नव्यानेच दाखल झालेले उपविभागीय पोलीस अधिकार्यांनी यामध्ये लक्ष घालून गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved