राज्यात तिसरा लॉकडाऊन जाहीर : अहमदनगरमध्ये या गोष्टी राहणार बंदच !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :-  राज्यात तिसरा लॉकडाऊन जाहीर झाला असून, त्याची सुरुवात आज सोमवारपासून होत आहे. मात्र या काळात काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याची नवी यादी सरकारने जारी केली आहे.

शैक्षणिक संस्था. शाळा, महाविद्यालये, सण, धार्मिक स्थळं, प्रार्थना स्थळंही सुरू ठेवता येणार नाहीत.विमान, रेल्वे किंवा आंतरराज्य रस्ते वाहतूक यांना बंदी कायम.

याशिवाय कोणतेही हॉटेल्स सुरू ठेवता येणार नाहीत. तसेच कोणत्याही प्रकारच्या सभा-संमेलनं घेता येणार नाहीत. खासगी क्सेलासला बंदी. केवळ ऑनलाईन किंवा दुरस्थ शिकवणीस परवानगी राहणार आहे.

65 वर्षाच्या व्यक्ती आणि  गर्भवती महिला व दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना अत्यावश्यक सेवेशिवाय सार्वजनिक ठिकाणी येण्यास मनाई आहे.

डिझेल आता 24 तास मिळणार आहे. पूर्वी याला मर्यादा होती. तसेच पेट्रोल आणि एलपीजी इंधन विक्रीची वेळ पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत राहणार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment